

gayatri datar husband
esakal
'तुला पाहते रे' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, या वर्षी अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी, पूजा बिरारी, यांनी यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर प्रेक्षकांची आवडती ज्ञानदा रामतीर्थकर हिनेदेखील नुकताच साखरपुडा केला. त्यापाठोपाठ मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिने तिच्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली होती. गायत्रीने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना तिच्या प्रेमाची झलक दाखवली होती. आता ख्रिसमसच्या निमित्ताने तिने अखेर तिच्या प्रेमाचा चेहरा दाखवला आहे.