

GENELIA DESHMUKH VAT POURNIMA
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय जोडी आणि महाराष्ट्राचे लाडके दादा आणि वहिनी म्हणजे अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख. त्यांनी आपल्या वागण्याने चाहत्यांना कपल गोल्स दिलेत. चाहते कायमच त्यांचं कौतुक करत असतात. ते दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. जिनिलिया लग्नानंतर देशमुख कुटुंबातील म्हणजेच महाराष्ट्रीयन परंपरेतील प्रत्येक सण साजरा करताना दिसते. अगदी गणपती असो किंवा अक्षय तृतीया अत्यंत आवडीने ती हे सण साजरे करते. मात्र यंदाची तिची वटपौर्णिमा तिने अगदी हटके पद्धतीने साजरी केलीये.