Genelia Deshmukh
esakal
Genelia Deshmukh shares Diwali celebration memories with Deshmukh family: प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. जिनिलियाचा साधेपणा सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड भावतो. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपले दैनंदिन अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. अनेक वेळा ती लातूरच्या घराचे तिथे केलेल्या मजामस्तीचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कोणतेही सणवार, दिवाळी असली की, रितेश आणि त्याची पुर्ण फॅमिली लातूरमध्ये एकत्र येतात आणि सण-वार साजरे करत असतात. अशातच एका मुलाखतीत जिनिलियाने लातूरच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.