महाराष्ट्राचं सर्वांचं लाडकं कपल अभिनेत्री जेनिलिया आणि रितेश यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. जेनिलिया आणि रितेश नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. अशातच आता जेनिलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. फादर्स डे निमित्ताने तिने ही पोस्ट केली आहे. त्यात तिने रितेशचं तोंडभरून कौतूक केलं आहे.