

“One Innocent Question Changed Everything: Why Genelia D’Souza Gave Up Non-Vegetarian Food”
esakal
Bollywood News: बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने आपला मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आहे. अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये तिने आपल्या या निर्णयामागची भावनिक कहाणी सांगितली. जेनेलियाला पूर्वी मांसाहार अतिशय आवडायचा. तिला वाटायचे की मांसाशिवाय एक दिवसही काढता येणार नाही. ती स्वतःला सांगायची की मांसाहार ही एक प्रकारची लक्झरी आहे, जीवनाचा आनंद आहे.