

genelia deshmukh remembering father in law vilasrao deshmukh
esakal
महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुखमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाला आज १४ वर्ष पूर्ण झालीत. आज १४ ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि विरोधकांकडूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय. अशातच त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक खास पोस्ट शेअर केली होती. आता विलासरावांची सून आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेदेखील दिवंगत सासऱ्यांसाठी भावनिक पोस्ट शेअर केलीये. आपल्याला मुलांना त्यांचे आजोबा भेटलेच नाहीत अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केलीये. सोबत रितेश आणि मुलांचा व्हिडिओ देखील शेअर केलाय.