‘फोर्स’ चित्रपटातील लग्न सीनमध्ये पुजाऱ्याने प्रत्यक्ष विधी केल्याने अफवा निर्माण झाल्या.
जेनेलियाने मुलाखतीत स्पष्ट केलं की, हे खरे लग्न नव्हे तर एक सीन होता.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा हे फोटो व्हायरल झाल्याने चर्चा रंगल्या आहेत.
अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून तिची मोठी ओळख आहे. रितेश आणि जेनिलियाची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. नेहमीच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर होत असतात. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे. रितेशच्या आधी जेनिलियाचं जॉन अब्राहमसोबत लग्न झालं असल्याचं बोललं जातय. दरम्यान मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे.