

Ghabadkund Marathi Movie Is First Marathi Universe Movie
esakal
Marathi Entertainment News : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होतोय. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.