Gharat Ganpati: "कथा घराची, घरातल्या प्रत्येकाची!”; घरत गणपती चित्रपटाची घोषणा, 'या' दिवशी होणार रिलीज

Gharat Ganpati: घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' (Gharat Ganpati) या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
"कथा घराची, घरातल्या प्रत्येकाची!”; घरत गणपती चित्रपटाची घोषणा, 'या' दिवशी होणार रिलीज
Gharat Ganpatiesakal

Gharat Ganpati: ‘कुटुंब’ हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' (Gharat Ganpati) या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

कधी रिलीज होणार 'घरत गणपती'?

‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट 26 जुलैला आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे.

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’ च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट ‘घरत गणपती’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

‘घरत गणपती’ची स्टार कास्ट

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

"कथा घराची, घरातल्या प्रत्येकाची!”; घरत गणपती चित्रपटाची घोषणा, 'या' दिवशी होणार रिलीज
Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com