'गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी खास क्षण; 'घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार

GHARAT GANPATI IN THEATERS: गणेशोत्सवाच्या निमित्ताने नात्यांचें बंध जपत, उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असू शकत नाही.
gharat ganpati
gharat ganpatiesakal
Updated on

काही कलाकृती या कायम पहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. अशा कलाकृतींच्या यादीतील 'घरत गणपती' हा चित्रपट. या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्ट पासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com