
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. या मालिका म्हणजे प्रेक्षकांचा अत्यंत आवडीचा विषय. मात्र मालिकांमध्ये कधीकधी अती करतात. त्यामुळे प्रेक्षकही या मालिकांवर टीका देखील करतात. अशीच टीका आता स्टार प्रवाहची मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' वर होताना दिसतेय. या मालिकेतील सध्याचा ट्रॅक पाहून आता प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. अत्यंत वाईट कथानक असल्याचं सांगत प्रेक्षक आता मालिकेवर टीका करत आहेत.