

girija oak on her mother in law
esakal
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या नॅशनल क्रश बनलीय. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांचं मन जिंकणारी गिरीजा अनेक चित्रपटांमध्ये दिसलीये. तिने शाहरुख खानसोबतही 'जवान' मध्ये काम केलंय. काही दिवसांपूर्वी गिरीजाच्या निळ्या साडीतील लूकने चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडलं होतं. ती रातोरात नॅशनल क्रश बनली. मात्र गिरीजाचं लग्न झालंय आणि ती एका मुलाची आई आहे हे अनेकांना ठाऊक नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सासूबाईंबद्दल सांगितलं आहे.