

GIRIJA OAK ON GIRISH OAK
esakal
काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देश जिच्यावर फिदा झाला होता ती मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटायला येते. आजही गिरिजाचे लाखो चाहते आहेत. गिरीजा लोकप्रिय अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. ती त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. मात्र गिरीजा लहान असतानाच ते दोघे वेगळे झाले. गिरिजाच्या आईचं नाव पद्मश्री फाटक. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर गिरीजा आईकडे राहायची. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केलं. आता एका मुलाखतीत गिरीजा तिच्या आणि तिच्या वडिलांमधल्या नात्याबद्दल बोलली आहे.