

girija oak
esakal
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक हिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलंय. काही महिन्यांपूर्वी गिरीजा नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय झाली होती. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी लग्न करणाऱ्या गिरिजाने दोन लग्नानंतर दोन वर्षातच आई होण्याचा निर्णय घेतला. गिरीजा कबीरला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायची हे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने नव्याने आई होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी आपला अनुभव सांगत खास सल्ला दिला आहे.