

girija oak
esakal
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जातेय. तिने लल्लनटॉपला दिलेली मुलाखत प्रचंड व्हायरल झाली. या मुलाखतीमधला तिचा लूक चाहत्यांच्या मनात घर करून राहिला. तिने या मुलाखतीत निळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घातला होता. तिचा साधेपणा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले. मात्रप्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. नॅशनल क्रश झाल्यावर गिरीजा ओकला काही वाईट गोष्टींना देखील सामोरं जावं लागतंय. तिला विचित्र कमेंट्स, मेसेजचाही सामना करावा लागतोय. तिने याबद्दल व्हिडिओ शेअर केला होता. आता एका मुलाखतीत ती याबद्दल बोलली आहे.