

girija ok
ESAKAL
अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटातून प्रेक्षकांची भेटीला आलेली गिरीजा ओक कित्येक जाहिरातीत दिसते. अनेक वर्ष ती मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम करतेय. तिने नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. त्यातील तिचा लूक प्रचंड व्हायरल झाला. यात तिने निळी साडी आणि स्लिव्हलेस ब्लॉउज परिधान केला होता. सोशल मीडियावर या मुलाखतीचे क्लिप्स व्हायरल होऊ लागल्यावर ही अभिनेत्री कोण अशी विचारणा होऊ लागली. त्यानंतर ही मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आहे हे सांगताना मराठी प्रेक्षकांनाही अभिमान वाटू लागला. रातोरात गिरीजा नॅशनल क्रश बनली. आता या सगळ्या प्रसिद्धीवर गिरिजाने प्रतिक्रिया दिलीये.