
girija godbole
esakal
गिरिजा ओक-गोडबोले हिने मराठीबरोबरच हिंदीतही काम केले आहे. तिने ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’ आणि ‘जवान’ या हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी रंगभूमीपासून मालिका तसेच चित्रपट अशी तिची वाटचाल झालेली आहे. नुकतीच ती नेटफ्लिक्सवरील ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटात झळकली आणि आता ती सोनी लिव्हवरील ‘१३वी ः सम लेसन्स आरेंट तॉट इन क्लासरूम’ या नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या प्रवासाबाबत तिच्याशी साधलेला खास संवाद...