
NASHIBVAN
ESAKAL
छोट्या पडद्यावर नव्याने सुरू झालेली मालिका 'नशीबवान' सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तर पहिल्याच आठवड्यात या मालिकेने त्या स्लॉट साठी ३. ७ इतका सगळ्यात जास्त टीआरपी मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. मालिकेतील रुद्रप्रताप आणि गिरीजाची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. आता मालिकेत काय घडतंय पाहूया.