

Bapya Movie Release Date
esakal
Marathi Entertainment News : आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘’आपली यारी… गावावर भारी!’’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि या वेगळ्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.