
Marathi Entertainment News : सध्या अनेक नवीन विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. भ्रष्टाचार या सामाजिक समस्येवर भाष्य करणारा निर्धार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समाजातील भ्रष्टाचारावर प्रहार करत नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं.