
ramcharan
esakal
ग्लोबल स्टार राम चरण याने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर क्रीडाजगतात एक नवा अध्याय सुरू केला आहे. नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका ऐतिहासिक सोहळ्यात त्याने आर्चरी प्रीमियर लीग (APL) चे उद्घाटन केलं. हा कार्यक्रम केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून एका भव्य उत्सव बनला. यासाठी हजारो चाहते उपस्थित होते. हजारो चाहत्यांच्या जल्लोषात राम चरणने मैदानात प्रवेश केला आणि त्याने प्रतीकात्मक रावण दहन केलं. हे दहन धनुर्विद्येसाठी आवश्यक असणारी एकाग्रता, शिस्त आणि विजयाची भावना यांचे प्रतीक होतं. 'मगधीरा', 'रंगस्थळम' आणि ऑस्कर-विजेत्या 'RRR' मधील अभिनयासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.