
फक्त गाण्यांच्या जोरावर आजपर्यंत अनेक चित्रपट हीट झालेत. काही गाणी वेदनांवर फुंकर घालतात तर काही गाणी जखमा पुन्हा ताज्या करतात. काही गाण्यांनी आपण चांगल्या आठवणीत हरवूनही जातो. पण एक गाणं असं आहे जे असं दु:ख देणारं आहे की या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. या गाण्यामुळे १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. या गाण्याला जगातलं सर्वात अपशकुनी गाणंही म्हटलं गेलंय.