

Gondhal Movie Promotional Song Out
esakal
Marathi Entertainment News : महाराष्ट्रीय लोकपरंपरेचा जल्लोष, भक्तीभावाची ऊर्जा आणि चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेला उत्साह यामध्ये आणखी भर घालत ‘गोंधळ’ चित्रपटातील दमदार प्रमोशनल गाणे ‘मल्हारी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून येणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित झाले असून, सध्या प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे.