Movie Review : गोंधळ - लोककला आणि लोकसंस्कृती यांचा उत्तम जागर

Gondhal Movie Review : गोंधळ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. कसा आहे हा सिनेमा जाणून घेऊया.
Gondhal Movie Review

Gondhal Movie Review

esakal

Updated on

सुमन (इशिता देशमुख) आणि आनंदराव (योगेश सोहोनी) यांचे नुकतेच लग्न झालेले असते. त्यांच्या आयुष्यातील सगळी विघ्ने दूर करण्यासाठी गोंधळ घातलेला असतो. परंतु सुमनचं मन मात्र अजूनही तिच्या भूतकाळाशी जोडलेलं असतं. एकेकाळी ती गावच्या पाटलाचा मुलगा सर्जेराव (निषाद भोईर) याच्या सोबत लग्न बंधनात अडकणार असते; परंतु प्रचंड हुंड्याच्या मागणीमुळे

त्यांचे लग्न काही होत नाही. आता सुमनच्या लग्नाचा गोंधळ विधी पार पडत असतानाच सुमन एक धक्कादायक डाव आखते. सर्जेरावाला फूस लावून आनंदरावची हत्या करण्यास प्रवृत्त करते. त्या मागे तिचा काही वेगळाच डाव असतो. मग सुमनचा हा डाव यशस्वी होतो का? सर्जेराव आनंदरावांचा खून करायला तयार होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील. Marathi Entertainment News : महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेत गोंधळ हा एक महत्त्वाचा लोककला प्रकार मानला जातो. हा प्रकार महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये विशेष करून आढळतो. महाराष्ट्रातील लोककला प्रकारामध्ये भजन आणि कीर्तनानंतर गोंधळाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ किंवा नवीन घर घेणे वा बांधणे, भावकीचं सुख अशा शुभ प्रसंगी आपल्या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घातला जातो आणि देव-देवतांची उपासना केली जाते. हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक असा कलाप्रकार आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com