
'अखियों से गोली मारे' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यात गेले काही वर्ष सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलं. सुनीताच्या प्रत्येक मुलाखतीत ती गोविंदापासून कधीच दुरावल्याचं तिने सांगितलं. या सगळ्यासाठी गोविंदा आणि त्याच्या सोबतची माणसं जबाबदार असल्याचं ती म्हणाली. आता सुनीताने अखेर गोविंदापासून वेगळं होण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. तसेच तिने गोविंदावर अनेक आरोप केलेलं आहेत.