

govinda on bollywood
esakal
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने इंडस्ट्रीमध्ये कित्येक वर्ष गाजवलीयेत. त्याने इंडस्ट्रीवर राज्य केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकेकाळी त्याच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागलेल्या असायच्या. मात्र आता गेली कित्येक वर्ष त्याचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नई. कुणी म्हणतं की त्याचं अफेअर सुरू आहे तर कुणी म्हंटल की यश त्याच्या डोक्यात गेलं. आता एका मुलाखतीत गोविंदाने 'डेंग्यू मच्छर' आणि 'औरंगजेब' अशी विशेषणं वापरत काही व्यक्ती आपल्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलंय. काही लोक असे आहेत ज्यांना मला हरताना पाहायला मजा येतेय.