रात्री ३ ला हल्ला झाला, गोविंदाच्या हातात बंदूक होती म्हणून... अभिनेत्याच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

GOVINDA MANAGER SHOCKING REVALATION: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या मॅनेजरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं आहे. ज्याच्या व्हिडिओ देखील त्याच्याकडे आहे.
GOVINDA

GOVINDA

ESAKAL

Updated on

अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा ठिकठिकाणी जाऊन मुलाखत देत आहे. अभिनेत्यावर बाहेर अफेअर असल्याचा आरोप करत आहे. मात्र अशातच गोविंदाच्या मॅनेजरने अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं आहे. गोविंदावर हल्ला झाला होता आणि त्याच्याकडे बंदूक होती म्हणून तो वाचला असं त्याच्या मॅनेजरने सांगितलंय. हे ऐकून सगळे चकीत झालेत. अभिनेत्याच्या मॅनेजरने आणखीही वेगवेगळे खुलासे केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com