
Bollywood Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 37 वर्षांचा त्यांचा संसार अचानक मोडणार हे समजल्यावर अनेक चाहत्यांना धक्का बसला. इतकंच नाही तर गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु असल्याचीही चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली. पण अखेर गोविंदाच्या वकिलांनी याबद्दल खुलासा केला आहे.