

govinda
esakal
अभिनेता गोविंदा यांच्यासोबत २०२४ मध्ये एक आगळीवेगळी घटना घडली होती. अभिनेत्याने त्याच्या राहत्या घरी चक्क स्वतःलाच गोळी मारून घेतली होती. त्याच्या पायाला गोळी लागली होती. तो रिव्हॉल्वर साफ करत असताना त्याच्या हातून चुकून गोळी सुटली. ज्यात तो जखमी झाला. आता घडलेल्या गोळीबार प्रकरणावर त्याची भाची आणि अभिनेत्री रागिनी खन्ना हिने नुकताच मोठा खुलासा केला आहे.