

GOVINDA
ESAKAL
१९९० चं दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एका मोठ्या उलथापालथीपेक्षा कमी नव्हतं. बॉलीवूडवर पूर्णपणे अंडरवर्ल्डचा ताबा होता आणि त्यांची पकड निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर अधिक मजबूत होत होती. दाऊद इब्राहिम, अबू सालेम आणि त्यांच्यासारख्या लोकांच्या इशाऱ्यांवरच हे कलाकार नाचत होते. १९९० च्या दशकात राम गोपाल वर्मा यांच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांनी अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट बनवायला सुरुवात केली आणि 'सत्या' आणि 'कंपनी' यांसारख्या चित्रपटांना ओळख मिळाली. मात्र, त्या काळातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटांमध्येही अंडरवर्ल्डनेच पैसे लावले होते.