

GOVINDA REPLY ON AFFAIR RUMOURS
ESAKAL
बॉलिवूडचा हिरो नं १ म्हणवला जाणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपटात काम केलं. आज तो सिनेसृष्टीपासून दूर असला तरी तो कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा एका ३० वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याचं सांगितलं जातंय. त्याची पत्नी सुनीता आहुजा हिनेच अभिनेत्यावर आरोप केलेत. अशात आता गोविंदानेही पहिल्यांदाच या प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्याने पत्नीच्या आरोपांवर उत्तर दिलंय.