
महाराष्ट्र दिनी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यात अजय देवगन आणि रितेश देशमुखचा 'रेड २' होता. त्यासोबतच दोन मराठी चित्रपट 'गुलकंद' आणि 'आता थांबायचं नाय' होते. 'गुलकंद' चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर ‘आता थांबायचं नाय’ सिनेमात भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र गेल्या १७ दिवसात 'रेड २' वर हे दोन्ही मराठी चित्रपट भारी पडताना दिसतायत. वाचा या दोन्ही चित्रपटांची कमाई.