

Gullak Series Actor Exit :
Entertainment News : भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या ओटीटी सिरीजपैकी एक असलेल्या ‘गुल्लक'चे दरवाजे पाचव्या सीझनसाठी पुन्हा एकदा उघडत आहेत. या नवीन सीझनमध्ये मिश्रा कुटुंबात एक परिचित पात्र पण नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेता अनंत व्ही. जोशी ‘गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये आनंद "अन्नू" मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांचे लाडके पात्र ‘अन्नू भैय्या'चा तोच निरागसपणा आणि भावनिक ओलावा अनंत आपल्या अभिनयातून पुढे नेणार आहे.