
चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईच्या संघर्षाची कहाणी सांगणारी लोकप्रिय वेब सीरिज ‘हाफ सीए’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेल्या अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने या बहुप्रतिक्षित सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये, पहिल्या सीझनमध्ये आपण पाहिलेल्या आर्ची मेहता आणि नीरज गोयल यांच्या पुढच्या प्रवासाची झलक दिसते. पहिल्या सीझनच्या शेवटी, आर्चीची तीन वर्षांची आर्टिकलशिप सुरू झाली होती आणि नीरज गोयल सीएच्या अंतिम परीक्षेचा शेवटचा प्रयत्न करत होता. दुसरा सीझन याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.