
Hollywood News : ऑस्कर 2025 म्हणजेच 97व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतोय. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायन करत आहेत. पण पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.