स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

NEW ACTOR ENTRY USHA NADKARNI YETECH ATA MI NANDAYLA NEW ENTRY : झी मराठीवरील उषा नाडकर्णी यांच्या ठकुबाई ची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यांच्या 'येतेच मी आता नांदायला' मालिकेत त्यांच्या नातवाची भूमिका कोण साकारणार याबद्दल माहिती समोर आलीये.
yetech ata mi nanadayala

yetech ata mi nanadayala

esakal

Updated on: 

मराठी छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका आणि कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठीने 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेची घोषणा केली. यात मराठमोळ्या अभिनेत्या उषा नाडकर्णी मुख्य भूमिकेत म्हणजेच ठकुबाईंच्या भूमिकेत आहेत. आता या मालिकेतील आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलंय. या मालिकेत ठकुबाईचा नातू कोण असणार आहे हे झी मराठीने शेअर केलंय. स्टार प्रवाहवरील मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता हर्षद अतकरी लवकरच झी मराठीवर झळकणार असल्याची चर्चा आहे. नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...