
मराठी सिनेसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी आक्कासाहेब बनून संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं, ज्यांच्या आवाजाने आजही समोरचा थरथर कापतो त्या प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकार म्हणजे हर्षदा खानविलकर. हर्षदा यांनी अनेक मालिका गाजवल्यात. त्यांच्या नजरेचा दरारा हा फक्त मालिकेतच नाही तर सेटवरही असतो. त्यांच्या 'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या मालिकांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. सध्या त्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दिसतायत. लवकरच गणेशोत्सव सुरू होईल. त्यानिमित्ताने हर्षदा यांनी त्यांचं आणि गणपती बाप्पाचं विशेष नातं सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या बाप्पाचं नाव शाहरुख ठेवलंय.