

harshada khanvilkar sanjay jadhav relationship
esakal
मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांनी अनेक मालिका केल्या मात्र 'पुढचं पाऊल' मालिकेतील त्यांची 'अक्कासाहेब' ही भूमिका प्रचंड गाजली, ज्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. याशिवाय 'आभाळमाया', 'रंग माझा वेगळा' (सौंदर्या इनामदार), 'ऊन पाऊस' आणि सध्या सुरू असलेली 'लक्ष्मी निवास' यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. मात्र हर्षदा यांचं नाव लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते संजय जाधव यांच्यासोबत जोडलं गेलं. त्यांच्या लग्न झाल्याच्या अफवा उडाल्या. त्या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे जाणून घेऊया.