Harshada Khanvilkar
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या त्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर. त्यांच्या मालिका हिट ठरल्या. मग ती 'पुढचं पाऊल असो किंवा 'आभाळमाया', 'रंग माझा वेगळा' असो किंवा माझिया 'प्रियाला प्रीत कळेना'. त्यांनी या मालिकांमधून स्वतःची छाप तर पाडलीच सोबतच स्वतःचा दबदबाही निर्माण केला. त्या सगळ्या कलाकारांच्या देखील लाडक्या आहेत. त्या सगळ्यांना प्रेमाने वागवतात मात्र सेटवर त्यांचा धाक देखील असतो.