

Harshada Khanvilkar & Sunil Barve New Natak
esakal
Marathi Entertainment News : काही दिवसांपूर्वी प्रतिभावान अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ''रंगभूमी खूप मिस करतेय'' अशी मनापासूनची भावना व्यक्त केली होती. चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळायची त्यांची इच्छा यातून स्पष्ट दिसत होती… मात्र संधी मिळत नसल्याची हलकीशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. याच दरम्यान अभिनेता सुनील बर्वे यांनीही आजच्या नवीन पिढीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली… त्यांचे हे व्हिडीओ चर्चेत असतानाच प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी एक व्हिडीओ शेअर करत ते कोणत्यातरी खास कारणासाठी बाहेर जात असल्याचं म्हटलं.