Mangla Movie: पाठमोरी बसलेली ती गायिका कोण ? अनुत्तरित प्रश्न उलगडला, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवालीची एंट्री

Shivali Parab New movie: आजवर शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता शिवाली ‘मंगला’ चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेतून मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे.
MANGLA MOVIE
MANGLA MOVIEESAKAL
Updated on: 

बऱ्याच दिवसांपासून एका पाठमोऱ्या बसलेल्या गायिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि त्याखाली ‘मंगला’ असे नाव येत होते. ही व्यक्ती कोण आहे, मंगला हे प्रकरण नेमकं काय आहे, असे काही प्रश्न अनुत्तरित होते. आता त्याचे उत्तर मिळणार असून, भयावह घटनेतून वाचलेल्या ‘मंगला’ या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास ‘मंगला’ या चित्रपटातून उलगडणार आहे. मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचे समोर आले आहे.

आजवर शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता शिवाली ‘मंगला’ चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेतून मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. मंगलावर झालेला ॲसिड अटॅक आणि त्यानंतर तिने परिस्थितीशी दिलेली झुंज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या ॲसिड अटॅक संबंधित कोणताही कायदा त्याकाळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला, हे पाहणं रंजक ठरेल.

Loading content, please wait...