
RITEISH DESHMUKH SCHOOL NAME
ESAKAL
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला. त्याच्या 'लय भारी' आणि 'वेड' चित्रपटाने मराठीत अनेक रेकॉर्ड तोडले. रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. मात्र त्याने कधीही त्यांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्याने स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्यांचं लातूरला मोठं घर आहे. रितेश कामानिमित्त मुंबईत असतो. मात्र तो लातूर किंवा मुंबईमध्ये शिकलेला नाही. त्याने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या शाळेबद्दल माहिती दिलीये.