Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

'हिरमंडी: द डायमंड बाजार' (Heeramandi The Diamond Bazaar) या वेब सीरिजची अनेकजण उत्सुकतेने वाट बघत होते. ही वेब सीरिज पाहिल्यानंतर अभिनेता शिझान खान भडकला आहे.
Heeramandi
Heeramandiesakal

Heeramandi The Diamond Bazaar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरमंडी: द डायमंड बाजार' (Heeramandi The Diamond Bazaar) या वेब सीरिजची अनेकजण उत्सुकतेने वाट बघत होते. ही वेब सीरिज काल (1 मे) रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. ही वेब सीरिज पाहिल्यानंतर अभिनेता शिझान खान भडकला आहे. त्यानं वेब सीरिजबद्दल एक पोस्ट शेअर करुन नाराजी व्यक्त केली आहे.

शिझान खानची पोस्ट

शिझान खाननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "फरीदा जलाल जी यांच्याशिवाय एसएलबी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये कुणालाही 'उर्दू' बोलता येत नव्हते! नुख्ता, खा, Qaf ! असं का? उर्दूवर इतका अन्याय? निराशाजनक!". शिझान खानच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela BhansaliESAKAL
Heeramandi
Heeramandi: संजय लीला भन्साळींचं व्हिजन, अन् सात महिने 700 कारागिरांची मेहनत.. असा तयार झाला हिरामंडीचा भव्य सेट

संजय लीला भन्साळी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'हिरामंडी' या वेब सीरिजची कल्पना त्यांच्या मनात 18 वर्षांपासून होती. या वेब सीरिजमध्ये त्यांना रेखा, करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी यांना कास्ट करायचे होते. तसेच पाकिस्तानी स्टार्स माहिरा खान, फवाद खान आणि इम्रान अब्बास यांचाही ते विचार करत होते. पण नंतर त्यांनी वेगळी स्टार कास्ट फाटनल केली.

'हिरामंडी'ची स्टार कास्ट

'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या देवदास (2002), बाजीराव मस्तानी (2015) आणि पद्मावत (2018) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या हिरामंडी ही वेब सीरिज देखील प्रेक्षक आवडीनं बघतात.

Heeramandi
Sanjay Leela Bhansali: हिरामंडीमधील 'सकल बन' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ; भव्य दिव्य सेट पाहून डोळे दिपतील!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com