

hema malini satte pe satta
esakal
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड गाजली. त्यांची केमिस्ट्री केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर ऑफ-स्क्रीनही प्रेक्षकांना खूप आवडायची. त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी फिल्मी जगतात त्यावेळी चांगलाच जोर धरला होता. रेखा आणि अमिताभ यांचे जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले होते, आणि त्यामुळेच प्रत्येक दिग्दर्शकाला या जोडीला आपल्या चित्रपटात घेण्याची इच्छा असायची. या जोडीने 'मिस्टर नटवरलाल', 'मुकद्दर का सिकंदर' आणि 'सिलसिला' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण एक चित्रपट असा होता, जो रेखाने अचानक सोडून दिला होता.