HEWAAN MOVIE REVIEW
esakal
AKSHAY KUMAR SAIF ALI KHAN HEWAAN REVIEW: खिलाडी कुमार अक्षय आणि सैफ अली खान ही जोडी तब्बल अठरा वर्षानंतर हैवान या चित्रपटासाठी एकत्र येणार म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. त्यातच प्रियदर्शनसारखा कल्पक व यशस्वी दिग्दर्शक असल्यामुळे हे त्रिकूट काही तरी भन्नाट कलाकृती करणार हे निश्चित होते. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण बांधलेले सगळे अंदाज निश्चित पूर्ण करणारा असा हा चित्रपट आहे. प्रियदर्शन यांची कथा आणि दिग्दर्शन तसेच त्याला अक्षय कुमार व सैफ अली खान यांच्या अभिनयाची उत्तम जोड पाहता ही भट्टी चांगलीच जमलेली आहे.