

hindavi patil on deepali sayyed statement
esakal
'बिग बॉस मराठी ६' नुकताच सुरू झाला. मात्र घरात जाताच पहिली ठिणगी पडली ती अभिनेत्री आणि राजकारणी दीपाली सय्यद आणि नृत्यांगना राधा मुंबईकर हिच्यात. घरात काम करत असताना दिपालीने राधाला टोमणा मारला होता ज्यावरून राधा चांगलीच संतापलेली. दीपाली म्हणालेली की 'लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात. बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता.' त्यावर राधानेही त्यादेखील आधी डान्स करायच्या, त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं, मी पण लायकी काढू शकते असं म्हणत संताप व्यक्त केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर नृत्यांगना हिंदवी पाटील हिने भाष्य केलंय.