मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यशही मिळवलं आहे. दरम्यान आता अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन प्रवास लवकरच प्रेक्षकांना चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. "हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी" चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.