गिरणगावातील चित्रपटसंस्कृतीला नवे रूप; ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृह आता ‘एचएम सिनेमा’

HINDMATA THEATER NEW NAME : एकेकाळी हिंदमाता चित्रपटगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेचे पुढे ‘हिंदमाता गोल्ड’ असे नामकरण झाले होते. आता ‘एचएम सिनेमा’ या नावाने त्याला नवे स्वरूप मिळाले आहे.
HINDMATA MOVIE THEATER

HINDMATA MOVIE THEATER

ESAKAL

Updated on: 

एकेकाळी गिरणगाव हा चित्रपटसंस्कृतीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जायचा. हिंदमाता, प्रीमियर, भारतमाता अशा चित्रपटगृहांमधून चित्रपटांचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या आठवणी आजही या परिसराशी जोडलेल्या आहेत. मात्र, काळानुसार या भागातील चित्रपटगृहांचे स्वरूप बदलत गेले. अशा परिस्थितीत दादरमधील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाच्या जागी आता ‘एचएम सिनेमा’ नव्या रूपात सुरू झाले आहे. अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात आले. दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील कुमार फन शॉपच्या दुसऱ्या मजल्यावर हे चित्रपटगृह सुरू झाले आहे. एकेकाळी हिंदमाता चित्रपटगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेचे पुढे ‘हिंदमाता गोल्ड’ असे नामकरण झाले होते. आता ‘एचएम सिनेमा’ या नावाने त्याला नवे स्वरूप मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com