

Home Minister World Record
ESakal
‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर यांचे प्रेक्षकांशी असलेले नातं नेहमीच खास राहिल आहे. गेली २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कार्यक्रमाने अनेक टप्पे गाठले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर प्रवास करत ‘होम मिनिस्टर’ने असंख्य वहिनींच्या घरापर्यंत पोहोचत त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण केले. आता नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमाने आणखी एक ऐतिहासिक क्षण आपल्या नावावर केला आहे.