
TEJASHREE PRADHAN
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने चाहत्यांना वेड लावलंय. तिने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. तेजश्रीचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. तिने 'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या तेजश्री 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत दिसतेय. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आलाय. मात्र यात स्वानंदीच्या तोंडी असलेलं वाक्य हे यापूर्वी जान्हवीच्या तोंडी होतं असं प्रेक्षकांनी सांगितलं आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये असलेलं ते वाक्य प्रेक्षकांनी लगेच ओळखलंय.